सई ताम्हणकरने 'त्याचा' उल्लेख करत फोटोंना दिलेल्या कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष

Swapnil Ghangale
Apr 19,2024

सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय

अभिनेत्री सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्टेड असते.

सईचे 34 लाखांहून अधिक फॉलोअर्स अन् ती पोस्ट

सध्या मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही सातत्याने झळकणाऱ्या सईचे इन्स्टाग्रामवर 34 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून सध्या तिची एक पोस्ट चर्चेत आहे.

शेअर केले फोटोशूटमधील फोटो

या पोस्टमध्ये सईने एका फोटोशूटमधील स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

अनेकांनी केलं सौंदर्याचं कौतुक

साईने परिधान केलेला बॉडीकॉर्न ड्रेस फारच सुंदर दिसत असून अनेकांनी कमेंट करुन सईच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

कॅप्शनने वेधलं लक्ष

मात्र या फोटोंना सईने दिलेली कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

कॅप्शनमध्ये काय म्हटलंय?

सईने चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो शेअर करताना, 'कॉफी, चॉकलेट आणि त्याचे डोळे' अशी कॅप्शन दिली आहे.

तिची सगळी व्यसनं...

सईने या पोस्टमध्ये शेवटी एका वाक्याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. त्यामध्ये, 'चॉकलेटी हा तिचा आवडता रंग होता. तिची सगळी व्यसनं ही चॉकलेटी रंगाचीच होती. कॉफी, चॉकलेट आणि त्याचे डोळेही...' असं लिहिलेलं आहे.

VIEW ALL

Read Next Story