पृथ्वीक हा त्याच्या नावापुढे आडनाव नाही तर त्याच्या वडिलांचे नाव लावतो.
आडनावाव न लावण्याचं कारण म्हणजे मला आजवर पाच मुलींनी जातीमुळे नकार दिला असे त्यानं सांगितले.
"जेव्हा आपण कुलकर्णी, शिंदे, पाटील अशी आडनावं सांगतो तेव्हा त्यावरून लगेचच आपल्याला जज केलं जातं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. मी लहानपणापासून हे पाहिलं आहे. माझ्या जवळचे अनेक मित्र यातून गेले आहेत. पण हा त्रास मला सहन होत नाही," असं पृथ्वीक म्हणाला.
चौकटीत अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटत नाही."
"प्रत्येकाला त्याच्या जातीचा आदर असतो. एखाद्याचं आडनाव माहित नसेल तर त्याला एक माणून म्हणून ट्रीट करण्यात येतो. आडनाव सांगितलं की जात शोधायला लागतात"
"माझे पाच ब्रेकअप आहेत, तर त्याचं हेच कारण होतं. तिघींनी मला जातीवरून नकार दिला."
"चौथी माझी गर्लफ्रेंड होती. तिच्या आई-बाबांसोबत माझ्यासोहत आजही चांगले नाते आहे. मात्र, तिनं काही काळानंतर माझ्या कामावर आणि पगावरावर प्रश्न उपस्थित केला. नकार देण्यासाठी वेगळी कारण शोधत होती. पण अखेर जात एक नाही सांगत नकार दिला."
"प्रत्येक जातीला त्याचा सन्मान मिळायला हवा, त्यावरून अस्तीव ठरायला नको. 'कांबळे' नसतो 'कुलकर्णी' असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावावरून एक माणूस म्हणून ओळख मिळायला हवी, असं पृथ्वीक म्हणाला. (All Photo Credit : PRITHVIK PRATAP Instagram)