बी आर चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'महाभारत' मालिकेत शकुनीमामाची भूमिका निभावणारे शकुनीमामा तुम्हाला आजही आठवत असतील.
गुफी पेंटल यांनी शकुनीमामाची भूमिका निभावली होती. ज्यासाठी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं.
गुफी पेंटल यांनी भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला होता. यावेळी त्यांचं लंगडत चालणं हे या भूमिकेचं वैशिष्ट्य होतं.
सुरुवातीला गुफी पेंटल यांना लंगडत चालताना फार त्रास व्हायचा. मात्र नंतर त्यांना याची सवयच लागली होती.
पण शकुनीमामाची भूमिका निभावणारे गुफी पेंटल लंगडत का चालायचे हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे गुफी पेंटलच कारणीभूत होते.
त्यांनीच बीआर चोप्रा आणि राही मासूम रजा यांना लंगडत चालण्याची कल्पना दिली होती. तसंच यामागील कारणही सांगितलं होतं.
गुफी पेंटल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे आजोबा सांगायचे जो माणूस वाईट असतो त्याला देव शारिरीक दोष देतो.
"अशा स्थितीत शकुनीमामा निगेटिव्ह भूमिकेत असल्याने लंगडत चालणं त्याला एक वेगळी ओळख देत होते, जे नंतर योग्यही सिद्ध झालं".
गुफी पेंटल यांचं खर नाव सरबजीत सिंह पेंटल होता. 4 ऑक्टोबर 1944 रोजी पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला होता.
गुफी पेंटल अभिनेता आणि दिग्दर्शक होते. 'महाभारत'मधील शकुनीमामा ही त्यांची सर्वोत्तम भूमिका ठरली.
5 जूनला गुफी पेंटल यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला