शरद पोंक्षे यांची लेक वैमानिक झाली आहे. त्यासाठी त्यांनी एक पोस्ट शेअर करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आरक्षण नसताना केवळ मेहनत करुन वैमानिक झाली असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांना अनेकांना ट्रोल केलं.
किरण माने म्हणाले की 'पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसले. तर घरातील लोकांविषयी म्हणतं किरण माने म्हणाले की थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्या हादऱ्याची तयारी कर...'
किरण माने म्हणाले की 'जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल… जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल !'
अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डॉ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! इतर अनेक देशांची नावे घेत डॉ. आंबेडकराचे स्मारक आणि शाळा दिसतील असं म्हटलं.
काहीजण Annihilation of Caste, The Untouchables: Who were they and why they Became Untouchables पुस्तक वाचताना दिसतील. त्याच देशातली तू आहेस हे कळल्यानंतर त्यांना आनंद होईल.
पोरी, तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. गुलामगिरी ते शोषित-पिडीतवर अनेक प्रश्न विचारतील.
अस्पृश्यतेबद्दल विचारता तू त्यांना सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत…’ अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे.
किरण माने पुढे म्हणाले की 'आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग ‘सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.’
किरण माने म्हणाले की जगात एकच धर्म असून तो मानवता आहे. तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी…तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!” (All Photo Credit : Respective Celebrity Instagram/ Social Media)