जान्हवीनं कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिला करणनं प्रश्न विचारला की कधी कोणी तिला फ्लर्टी मेजेस केला आहे का?
याविषयी बोलत असताना जान्हवी खुशीकडे बघत म्हणाली, 'मला वाटतंय की हे ऐकल्यानंतर तू माझ्यावर चिडशील.'
जान्हवीनं खुलासा केला की एका अभिनेत्यानं तिला मेसेज केला होता की 'मी तुझे सगळे ब्यूटी स्पॉट पाहू शकतो का?'
जान्हवीनं असं सांगताच करण जोहर जोरजोरात हसू लागला. त्यानं पुढे जान्हवीला विचारले की 'असे तिचे किती स्पॉट आहेत.' उत्तर देत जान्हवी म्हणाली की 'खूप.' त्यामुळे तो कोण अभिनेता आहे काही समोर आलेलं नाही.
जान्हवीनं तिची बहिणी खुशीला रॅपिड फायर दरम्यान, अनन्या पांडेचं नाव येताच सल्ला दिला की 'एकाच मुलाच्या प्रेमात पडू नको.'
जान्हवी आणि अनन्या या दोघांनी ईशान खट्टला डेट केलं होतं. जान्हवीनं ईशानसोबत 'धडक' आणि अनन्यानं 'खाली पीली' या चित्रपटात काम केलं. त्यामुळे जान्हवी थोडक्यात असाच इशारा देत होती असं म्हटलं जातं.
यावेळी जान्हवीनं खुलासा केला की ती कधीच बॉलिवूड अभिनेत्याला डेट करणार नाही. ही सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे, जे तिला आयुष्यात नकोय. तिची इच्छा आहे की तिच्या पार्टनरनं तिच्यावर प्रेम करावं. (All Photo Credit : Janhvi Kapoor Instagram)