बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान अद्यापही तिने आपल्या बाळाच्या वडिलांचं नाव लपवून ठेवलं आहे.
पण सोशल मीडियाच्या माध्यमातून इलियाना चाहत्यांना आपल्या प्रेग्नंसीसंबंधी माहिती देत असते.
नुकतंच इलियानो पोस्ट करत आपण प्रेग्नंसीच्या थर्ड ट्रायमेस्टर म्हणजेच नवव्या महिन्यात असल्याची माहिती दिली होती.
अशा स्थितीत सध्या इलियानाला फार आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. मात्र तरीही इलियाना आपल्या प्रेग्नंसीचा आनंद लुटत आहे.
इलियानाने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मी काही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा 9 व्या महिन्यातील थकवा मला काही काम करु देत नाही आहे.
फोटोत इलियाना साध्या लूकमध्ये दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी इलियानाने एक फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनची झलक दाखवली होती.
इलियानाच्या या ब्लर आणि रोमँटिक फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती. इलियानाच्या आयुष्यातील ही व्यक्ती नेमकी कोण आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
इलियाना लग्न न करताच आई होणार आहे. मात्र लोक काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही हे तिने आधीच स्पष्ट केलं आहे.