...अन् सिगारेटमुळे माझ्या ह्रदयाची धडधड वेगाने वाढली, ह्रतिकने सांगितला धक्कादायक अनुभव

Jan 30,2024

'फायटर' 200 कोटींच्या पार

ह्रतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने जगभरातील कमाईत 200 कोटींचा आकडा पार केला आहे.

धुम्रपान केल्याने बिघडली तब्येत

हा आनंद साजरा करण्यासाठी ह्रतिकने धुम्रपान केलं. पण एक पफ घेताच त्याची तब्येत बिघडली आणि ह्रदयाचे ठोके वाढले.

धुम्रपान, मद्यपान सोडलं

यानंतर त्याने तात्काळ सिगारेट सोडली. ह्रतिकनेच एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ह्रतिकने चित्रपटासाठी धुम्रपान, मद्यपान सोडलं होतं.

तीन वेळा बॉडी ट्रान्सफर्मेशन

ह्रतिकने सांगितलं की, मी फायटरसाठी तीन वेळा बॉडी ट्रान्सफर्मेशन केलं. हे फार आव्हानात्मक होतं. माझ्यात तितकी क्षमता आहे का हे मला पाहायचं होतं.

दुसऱ्यांदा करत असताना हवामान खराब असल्याने शुटिंग रद्द झालं. यामुळे मी मुलांसह सुट्टीवर गेलो.

यानंतर मी तिसरं ट्रान्सफॉर्मेशन केलं. त्यासाठी माझ्याकडे 6 ते 8 आठवडे होते. मी सलग 3 गाण्याचं शुटिंग करत होतो. माझी धावपळ सुरु होती.

माझं सर्व शुटिंग झाल्यानंतर मी कशाप्रकारे सेलिब्रेट करायचं हा विचार करत होतो. मी फार रिलॅक्स होतो.

गाजर हलवा, आयस्क्रीम खाल्ल्यानंतर मी सिगारेट उचलली आणि धुम्रपान सुरु केलं.

'मी तात्काळ धुम्रपान थाबंवलं'

पण त्यानंतर माझ्या ह्रदयाची धडधड 45 ते 75 पर्यंत गेली आणि वेगाने वाढली. मी तात्काळ धुम्रपान थाबंवलं. ती भावना फार भयानक होती. आपण फक्त तेव्हाचीच प्लानिंग करतो, नंतरची नाही. पण तीदेखील केली पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story