'पिरिएड्सच्या पहिल्याच दिवशी मी...', अभिनेत्रीनं सांगितला 'हीरामंडी'च्या सेटवरील 'तो' अनुभव

एका महिन्यानंतरही चर्चेत

दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांच्या 'हीरामंडी' वेब सीरीज प्रदर्शनाच्या एका महिन्यानंतरही चर्चेत आहे.

दिग्दर्शकाचंही कौतुक

'हीरामंडी' वेब सीरीज अनेकांच्या पसंतीत पडली असून बऱ्याच जाणांनी कलाकारांबरोबरच दिग्दर्शकाचंही कौतुक केलं आहे.

तगडी स्टारकास्ट

मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, ऋचा चड्ढा, अदिती राव हैदरी, शर्मिन सहगल अशी तगडी स्टारकास्ट आहे.

अनेकांचं लक्ष वेधून घेतलं

अभिनेत्री संजीदा शेखनेही तिच्या अभिनयाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

अनुभव सांगितला

दरम्यान, संजीदाने 'हीरामंडी'च्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला असून त्यामध्ये तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

पिरिएड्सच्या पहिल्याच दिवशी...

'माझ्या पिरिएड्सच्या पहिल्याच दिवशी मी 'हीरामंडी'मधील मुजरा (नजरीया मारी) शूट केला होता', असं संजीदा शेखने सांगितलं.

पिरिएड्सचा दुसरा दिवस फारच त्रासदायक

"माझ्यासाठी पिरिएड्सचा दुसरा दिवस फारच त्रासदायक असतो. मात्र मी शुटींगमध्ये एवढी गुंतून गेले होते की मी सर्व त्रास विसरले," असंही संजीदा शेख म्हणाली.

माझं शूट लवकर उरकायचे निर्माते

मात्र निर्माते त्या दिवसांमध्ये माझं शुटींग लवकर संपवायचे. कारण मी थोडा आराम केला तरी मला बरं वाटेल हे त्यांना ठाऊक होतं, असंही संजीदा शेख म्हणाली.

पिरिएड्सबद्दल उघडपणे बोललं पाहिजे

संजीदा शेखने हा अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे महिलांनी पिरिएड्सबद्दल उघडपणे बोललं पाहिजे असा संदेश दिला द्यायचा होता.

VIEW ALL

Read Next Story