'पाताळ लोक'च्या 'हाथीराम' ने 5 महिन्यात कमी केलं 27 किलो वजन

नेहा चौधरी
Jan 30,2025


पाताळ लोक सीझन 1 मधील त्याच्या दमदार अभिनयानंतर अभिनेता जयदीप अहलावत यांची प्रशंसा झाली. आता सीझन 2 मधील त्याच्या भूमिकेतून तो वर्चस्व गाजवतोय.


जयदीप अहलावत याने पाताळ लोकमध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला वजन वाढवावे लागले होते.


तर जयदीप अहलावतने महाराज चित्रपटासाठी आपलं वजन 109.7 किलो वरुन 82 किलोपर्यंत वजन कमी केलं होतं आणि तेही 5 महिन्यांमध्ये.


त्यावेळी जयदीपने मीडियाला सांगितलं होतं की, त्या पाच महिन्यांत दिवसातून तीन वेळा वर्कआउट करायचा. मी जास्त प्रथिने आणि कमी कॅलरी घेतल्या.


सुरुवातीला माझ्या ट्रेनरने मला माझ्यटा खाण्यावर फार मर्यादा आपल्या नाहीत कारण मला कोणताही डाएट प्लन माहिती नव्हता. कारण एखाद्या व्यक्तीला पहिल्या दिवशी 10 पराठे मिळाली खायला तर दुसऱ्या दिवशी एकही न मिळाल्यास तो वेडा होऊ शकतो.


उच्च प्रथिनांसह कमी कॅलरीजचे लक्ष्य साध्य केलं गेलं. सुदैवाने मला रोज साखर किंवा सोडा आवडत नाही. जे त्रायदायक ठरलं असतं. पण मला पावभाजी, चटणी, लस्सी, छोटे भटुरे आणि पराठे यासारखे मसालेदार पदार्थ हवे होते.


पुढे तो म्हणाला की, वर्कआउट करताना मी अनेकदा रडलो कारण माझ्या शरीरात खूप वेदना होत होत्या. ड्रॉप सेट वर्कआउट करताना मला खूप वेदना होत होत्या. ज्यामध्ये वारंवार कमी वजन उचलणे समाविष्ट होतं. ते उचलताना माझ्या डोळ्यांतून अश्रू येत असतं पण त्याचा परिणाम हास्यात करायचो.


पुढे म्हणाला की, त्याचे ध्येय जास्त स्नायू मिळवणे नाही, तर सामान्य शरीर मिळवणे आणि वजन कमी करण्याचा त्याचा प्रवास पूर्णपणे निरोगी आहे.


जयदीपच्या मते, मी फक्त व्यायाम करत होतो. नीट जेवत होतो आणि वेळेवर झोपत होतो. मला वाटतं साडेपाच महिने खूप मोठे आहेत. त्या सहा महिन्यांत मी सातत्याने शिस्तबद्ध होतो.


त्याने डाएटबद्दल पण सांगितलं. तो म्हणाला की, माझ्या आहारात चिकन, क्विनोओ, चीज, अंडी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश होता.

VIEW ALL

Read Next Story