एका अभिनेत्यासाठी त्याचे केस खूप महत्वाचे असतात. पण जर त्या अभिनेत्याला 19 व्या वर्षीच टक्कल पडलं तर...
बॉलिवूडमधील एका अभिनेत्याचं असंच झालं.
हा अभिनेता दुसरा कोण नसून बॉलिवूडचा लोकप्रिय कलाकार अक्षय खन्ना आहे.
अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटातील लक्षणीय भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे.
पण एक काळ असा होता जेव्हा अभिनय क्षेत्रात अक्षय खन्ना यशाच्या शिखरावर होता. तेव्हाच अचानक त्याला केस गळतीचा सामना करावा लागला.
एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितले की त्याच्यासाठी ही घटना, पियानो वाजवणाऱ्याची बोटं तुटली असावी अशी होती.
काही काळासाठी तो खूप डिप्रेशनमध्ये होता. पण त्याने कधी टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रन्सप्लांट करण्याचा किंवा विग लावण्याचा विचार केला नाही.
शेवटी अभिनेता अक्षय खन्नाने सत्याचा स्वीकार केला आणि पुढे वाटचाल केली.