कोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक

Diksha Patil
Oct 21,2023

शैक्षणिक पार्श्वभूमी

विकी जैन यांनी अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयात शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए केले.

कौटुंबिक व्यवसाय

विकी जैन हा एका व्यावसायिक कुटुंबातून आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन हे विविध व्यवसायात सक्रियपणे सहभागी आहेत.

कोळसा व्यवसाय

एमबीए पूर्ण केल्यानंतर, विकी त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायात सामील झाला. तो महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे. याशिवाय, कोळसा, वॉशरी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, वीज, हिरे आणि रिअल इस्टेट यासोबत विविध व्यवसायांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

बिल्डर्स ते फर्निचर शोरूम

जैन कुटूंबियांचीमहावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स नावाची कंपनी आहे. याव्यतिरिक्त, ते बिलासपूरमध्ये फर्निचर शोरूम चालवतात. त्यांचे वडील विनोद जैन हे बिलासपूरमधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

किक्रेट लीगमध्ये टीमचा मालक

विकी जैन हा क्रीडाप्रेमी असून तो बॉक्स क्रिकेट लीग (BCL) संघ, मुंबई टायगर्सचा सह-मालक आहे.

प्रॉपर्टी

विकी आणि अंकिता लोखंडे यांच्याकडे मुंबईत 3BHK अपार्टमेंट आहे. नुकतच त्यांनी मुंबईच्या उपनगरात 8BHK प्रॉपर्टीत गुंतवणूक केली आहे,

कार

विकीचेकडे लँड क्रूझर आणि मर्सिडीज-बेंझ आहे, तर अंकिता लोखंडेकडे जग्वार एक्सएफ आणि पोर्श 718 आहे. विकीची अंदाजे एकूण संपत्ती 100 कोटी आहे.

लग्न कधी केलं

विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे लग्ना आधी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईत त्यांचे थाटामाटात लग्न झाले. (All Photo Credit : Ankita Lokhande Instagram)

VIEW ALL

Read Next Story