फोटोची चर्चा

त्याने पोस्ट केलेल्या विमानातील या फोटोवर अनेकांनी त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

May 29,2023

दमदार कामगिरीची अपेक्षा

यशस्वीला मुख्य संघात स्थान मिळणार की नाही हे सामन्याच्या दिवशी स्पष्ट होईलच. पण दमदार कामगिरी करण्याचा त्याचा मानस असणार यात शंका नाही.

कॅप्शनमध्ये काय म्हटलंय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना! सोबत आहे वन अॅण्ड ओन्ली रोहित शर्मा, असं यशस्वीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच 'I trust I believe' असंही तो या कॅप्शनमध्ये म्हणालाय.

7 लाखांच्या आसापास लाईक्स

यशस्वीने रोहितबरोबर पोस्ट केलेल्या या सेल्फीला पहिल्या 14 तासांमध्ये 6 लाख 98 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. या फोटोची कॅप्शनही चर्चेत आहे.

रोहित शर्माची सोबत

अन्य एका पोस्टमध्ये यशस्वीने कर्णधार रोहित शर्माही त्याच्यासोबत या प्रवासात असल्याचं सांगणारा फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.

इंग्लंडला रवाना

यशस्वी रविवारी सायंकाळी इंग्लंडला रवाना झाला. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विमानात बसलेला असताना इन्स्ताग्रामवर हा फोटो शेअर केला.

बक्षीस म्हणून यशस्वीला संघात स्थान

दमदार कामगिरीच्या जोरावरच यशस्वीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संघात स्थान देण्यात आलं आहे.

संघ बाहेर पण कामगिरीने जिंकली मनं

राजस्थानचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडला. मात्र यशस्वीच्या कामगिरीने चाहत्यांबरोबरच निवड समितीमधील अधिकाऱ्यांचंही लक्ष वेधलं.

धावांचा डोंगर

यशस्वीने यंदाच्या पर्वामध्ये तब्बल 625 धावा केल्या आहेत. 164 च्या स्ट्राइक रेटने त्याने या धावा केवळ 14 सामन्यांमध्ये केल्या.

दमदार फलंदाजी

ऋतुराजच्या जागी इंग्लंडला भारतीय संघाबरोबर जात असलेल्या खेळाडूचं नाव आहे यशस्वी जयस्वाल. यशस्वीने यंदाच्या म्हणजेच 2023 च्या IPL मध्ये तुफान फलंदाजी केली आहे.

ऋतुराजच्या जागी नव्या खेळाडूला संधी

ऋतुराजच्या जागी यंदाच्या सिझनमधून राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या एका तरुण भारतीयाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संधी देण्यात आली आहे.

या कारणामुळे पडला बाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडण्यामागे ऋतुराजने लग्नाचं कारण दिलं आहे. लग्न ठरल्याने या स्पर्धेसाठी जाता येणार नाही असं ऋततुराजच्या निकटवर्तींनी सांगितलं आहे.

या खेळाडूचं नाव आहे...

चेन्नईच्या संघातून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. मात्र त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून चेन्नईचा सुपरस्टार बाहेर

अगदी शेवटच्या क्षणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून अंतिम सामान्यापर्यंत मजल मारणाऱ्या सीएसकेच्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूला डच्चू देण्यात आला आहे.

इंग्लंडला रवाना कॅप्टन हिटमॅनबरोबरच्या सेल्फीची कॅप्शन चर्चेत

त्याने विमान प्रवासाला सुरुवात करण्याआधी पोस्ट केलेला फोटो व्हायरल

VIEW ALL

Read Next Story