2009 साली वेस्टइंडीजविरुद्धच्या सामन्यात तिलकरत्ने दिलशाननं 96 धावा केल्या होत्या पण, याला शतक बनवता आलं नाही . श्रीलंकेचा हा खेळाडू टी20 विश्वचषकामध्ये एकदा शतक ठोकण्यापासून चुकला आहे.
मार्टिन गुप्टिल न्यूझीलंडचा एक उत्तम खेळाडू असून त्यानं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात 93 धावा केल्या. नर्व्हस नाईंटीजमुळे त्याला शतक पूर्ण करता आलं नाही.
पाकिस्तानच्या उमर अकमलची 2014च्या टी20 विश्वचषकामध्ये 94 धावांनंतर विकेट पडली होती.
इंग्लंडच्या ल्यूक राइटनं 2012साली अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 99 धावा केल्या होत्या. पण, एका धावेनं शतक ठोकण्यापासून चुकला.
डेव्हन कॉन्वेनं 2021-22च्या टी20 वर्ल्डकप सिझनमध्ये उत्तम प्रदर्शन केलं होतं. त्याने 92 धावा केल्या पण, 8 धावांनी तो शतक ठोकण्यापासून चुकला.
हर्शेल गिब्सनं 2010 साली वेस्टइंडीजविरुद्धच्या सामन्यात 90 धावा केल्या. पण, शतक ठोकण्यापासून तो चुकला.
साउथ आफ्रीकाच्या डुसेननं इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 94 धावा केल्या होत्या.