doctors

डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले

डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईतल्या तीन रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये ४८, केईएम हॉस्पिटलमध्ये ५३ तर नायर हॉस्पिटलमध्ये ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली आहे. 

Mar 24, 2017, 04:10 PM IST

गुवाहटीमध्ये डॉक्टरांनी हेल्मेट घालून महाराष्ट्रातील डॉक्टरांचं केलं समर्थन

राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं.

Mar 24, 2017, 11:50 AM IST

...तर डॉक्टरांविरोधात अवमान याचिका करणार दाखल

राज्यभरातले निवासी डॉक्टर आज कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी ऍड. दत्ता माने यांनी केलीय. सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयात ते अवमान याचिका दाखल करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीवेळी निवासी डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.

Mar 24, 2017, 10:32 AM IST

डॉक्टरांचे प्रतिनिधी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत.

Mar 24, 2017, 08:55 AM IST

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे प्रचंड हाल

राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

Mar 20, 2017, 11:15 AM IST