अधिवेशन

अधिवेशनाचं फलित ?

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते सभागृहातील कामकाजापेक्षा बाहेरील मुद्यांमुळे गाजले. पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशीला झालेली मारहाण, त्यानंतर आमदारांचे झालेले निलंबन, अजित दादांचे वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या मुद्यांमुळे अधिवेशनाचे कामकाज 1-2 नव्हे तर तब्बल 11 दिवस वाया गेले.

Apr 18, 2013, 11:58 PM IST

मनसे अधिक आक्रमक होणार, राज बैठकीत निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.

Mar 10, 2013, 02:41 PM IST

`जरा अधिवेशन होऊन जाऊ दे, मग बघतो अझफल गुरूकडे`

सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांच्यावर लगेचच पत्रकारांनी अफझल गुरू आणि अजमल कसाब यांच्या फाशीबद्दल प्रश्‍नांचा भडिमार केला होता.

Dec 9, 2012, 12:09 AM IST

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळानं गाजलेल्या या अधिवेशनात आजही कामकाज होण्याची शक्यता कमीच आहे.

Sep 7, 2012, 09:46 AM IST

आर आर पाटलांचा लागणार कस

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.

Jul 13, 2012, 02:55 PM IST

सुनील तटकरेंचा ‘हवाला’शी संबंध?

जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.

Jul 13, 2012, 09:26 AM IST