आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये आज पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामना होणार होता. पण पावसामुळे रावळपिंडी क्रिकेट स्टेडिअममध्ये होणारा सामना रद्द झाला आहे. पावसामुळे टॉसही उडवला नाही. सामना रद्द झाल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशला प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. दोन्ही संघ याआधीच चॅम्पिअन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. याच मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत होणारा सामनाही पावसामुळे रद्द झाला.
चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान संघाला भारत आणि न्यूझीलंडसह ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आलं होतं. ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड संघ आधीच सेमी-फायनलमध्ये पोहोचले आहेत. पण त्यांच्यातील कोणता संघ पहिल्या क्रमांकावर असेल याचा निर्णय 2 मार्चला होईल. न्यूझीलंड संघ दोनपैकी दोन सामने जिंकत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या संघाचा नेट रनरेट 0.863 आहे.
दुसरीकडे भारतीय संघ सध्या दोन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे 4 गुण असून, 0.647 चा रनरेट आहे. यानंतर बांगालदेश तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे समान गुण आहेत, मात्र रनरेटमुळे पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
Rain plays spoilsport as #PAKvBAN is called-off in Rawalpindi
More https://t.co/sH1r63WCCD pic.twitter.com/hFe6ETayTG
— ICC (@ICC) February 27, 2025
बांगलादेशचा पहिल्या सामन्यात भारताने 6 गडी राखून पराभव केला होता. यानंतर न्यूझीलंडने 5 गडी राखून पराभूत केलं. दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 60 धावांनी मात दिली. यानंतर भारताने 6 गडी राखून धूळ चारली. पाकिस्तान आणि बांगलादेश संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर पडले आहेत.
बांग्लादेश संघ: तंजीद हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, जेकर अली, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, नाहिद राणा, तंजीम हसन साकिब, परवेज हुसैन एमोन, नसुम अहमद, सौम्य सरकार.
पाकिस्तानी संघ: इमाम उल हक, बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तैय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, फहीम अशरफ.