AFG vs ENG: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानने इंग्लंडला नमवलं; आता पुढे काय?

England vs Afghanistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडवर मात करत मोठी कमाल करुन दाखवली.

Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2025, 06:41 AM IST
AFG vs ENG: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानने इंग्लंडला नमवलं; आता पुढे काय?
चॅम्पियन्स ट्रॉफी

England vs Afghanistan: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या मोठा ट्विस्ट आलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडवर मात करत मोठी कमाल करुन दाखवली. इब्राहिम जादरानच्या 117 रन्सच्या खेळीमुळे अफगाणिस्तानला ही कमाल करवून दाखवली. गद्दाफी स्टेडीयममध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पहिली बॅटींग करत 7 विकेट्सच्या बदल्यात 325 रन्सचा डोंगर उभा केला. 

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमने सुरुवात चांगली केली. पण लक्ष्य गाठण्यासाठी 8 रन्स असताना इंग्लंडची टीम ऑलआऊट झाली. जो रूटच्या शतकाने इंग्लंडला विजयाची आशा निर्माण केली होती. त्याने तूफान फलंदाजी करत 120 रन्स केले. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये सामना जिंकून दिला. इंग्लंडचा संघ फक्त 317 धावांवर ऑलआउट झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. 

झद्रानला पुढे इंग्लंडचे गोलंदाज नमले 

इंग्लंडच्या गोलंदाजांना अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानला शह देता आला नाही. अवघ्या 23 वर्षीय तरुण सलामीवीराने गोलंदाजांना सळो की पळो करत 177 धावा फटकावल्या. जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी आहे. 'सामनावीर' ठरलेल्या झद्रानने एका टोकावर उभे राहून अफगाणिस्तानचा डळमळीत डाव वाचवला. एवढेच नव्हे तर त्याने टीमला 300 पेक्षा जास्त धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय शाहिदी, अझमतुल्ला आणि मोहम्मद नबी यांनी अनुक्रमे 40, 41 आणि 40 धावांचे योगदान दिले.

जो रूटचे शतक गेले वाया 

अफगाणिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडची टीम मैदानात उतरली. स्टार फलंदाज जो रूटने विजय मिळवून आणणार असे वाटत होते. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. रूटने 120 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्याशिवाय बेन डकेट आणि कर्णधार जोस बटलर यांनी 38-38 धावा केल्या. रूट क्रीजवर असताना इंग्लंड सामना जिंकेल, असे वाटत होते पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार कामगिरी केली आणि इंग्लंडला 317 धावांत गुंडाळले. 

आता ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन संघाला हरवणार?

या पराभवामुळे इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीतील बाहेर जावे लागले आहे. कारण हा त्यांचा सलग दुसरा पराभव आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर इंग्लंड हा स्पर्धेतून बाहेर पडलेला तिसरा संघ आहे. अफगाणिस्तानने सामना जिंकला आणि उपांत्य फेरी दिशेने आगेकूच केली. अफगाणिस्तानने 2 महत्त्वाचे गुण मिळवत ग्रुप ए मध्ये दक्षिण आफ्रिका (पहिल्या क्रमांकावर) आणि ऑस्ट्रेलिया (दुसऱ्या क्रमांकावर) मागे तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. अफगाणिस्तानचा शेवटचा ग्रुप सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. जर अफगाण टीमने हा सामना जिंकला तर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित होईल. असे असले तरी ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन संघाला हरवणे इतके सोपे असणार नाही.