Shukra Vakri 2023 : सिंह राशीत शुक्र होणार वक्री; 'या' राशींचा संकटांचा काळ होणार सुरु

Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या गोचर स्थितीला खूप महत्त्वं दिलं जातं. प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह 23 जुलै रोजी सकाळी 6.01 वाजता सिंह राशीत वक्री होणार आहे. शुक्र जेव्हा वक्री होतो तेव्हा तो प्रत्येक राशीला संमिश्र परिणाम देतो. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळणार आहेत. तर काही राशींना याच्या विपरीत परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

शुक्र हा सुख आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत शुक्राची वक्री गती काही राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शुक्र वक्रीमुळे कोणत्या राशींना अडचणी येणार आहेत. 

मिथुन रास

शुक्राच्या वक्री गतीमुळे मिथुन राशीच्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यावेळी त्यांच्या भवितव्याबद्दल खूप चिंता असणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ थोडा कमजोर असू शकतो. या दरम्यान तुम्ही कुठेही पैसे गुंतवत असाल तर काळजी घ्या. आर्थिक बाबतीत खूप विचार करावा लागेल. कुटुंबातील कलह वाढू शकतात.

कर्क रास

शुक्राच्या वक्री गतीच्या प्रभावामुळे कर्क राशींना अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्हाला या कालावधीत कोणतेही मोठे व्यावसायिक निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच तुम्ही जो काही निर्णय घ्याल ते चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. एखाद्या कामाने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

सिंह रास

शुक्राच्या वक्री गतीचा सिंह राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. आयुष्यात यापूर्वी कोणतीही समस्या असेल तर ती वाढण्याची शक्यता आहे. कोणतंही काम करताना काळजी घ्या, तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. यासोबतच आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी शत्रू तुम्हाला त्रास देतील. 

कुंभ रास

शुक्राची वक्री गती कुंभ राशीच्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यासोबतच पैशाच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचा अनावश्यक खर्च जास्त असणार आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Shukra Vakri 2023 Venus is going to retrograde in Leo people of these zodiac signs should be careful
News Source: 
Home Title: 

Shukra Vakri 2023 : सिंह राशीत शुक्र होणार वक्री; 'या' राशींचा संकटांचा काळ होणार सुरु

Shukra Vakri 2023 : सिंह राशीत शुक्र होणार वक्री; 'या' राशींचा संकटांचा काळ होणार सुरु
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Surabhi Jagdish
Mobile Title: 
Shukra Vakri : सिंह राशीत शुक्र होणार वक्री; 'या' राशींचा संकटांचा काळ होणार सुरु
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, July 15, 2023 - 21:08
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
291