September 2022: सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळतील शुभ परिणाम

September Grah Gochar 2022: ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे पाच दिवस उरले असताना अनेकांनी पुढच्या महिन्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, ग्रहांची साथ मिळणार का? कारण ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येतो. परंतु काही राशींना या गोचराचा विशेष लाभ होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर गोचर करतो.  सप्टेंबरमध्ये 2 ग्रह राशी बदलणार आहेत, तर एक ग्रह वक्री होणार आहे. या बदलाचा परिणाम काही राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायावर होईल.

बुध ग्रह 10 सप्टेंबर रोजी वक्री होणार आहे. यानंतर 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह देखील कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे कन्या राशीत सूर्य आणि शुक्राची युती होईल. यामुळे चार राशींना करिअर, व्यवसाय आणि पैसा यामध्ये विशेष लाभ मिळेल.

  • सूर्य - महिन्याच्या सुरुवातीला सिंह राशीत, 17 सप्टेंबर कन्या राशीत
  • मंगळ- वृषभ राशीत
  • बुध- महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत, 10 सप्टेंबरपासून वक्री
  • गुरु- मीन राशीत वक्री
  • शुक्र- महिन्याच्या सुरुवातीला सिंह राशीत, 24 सप्टेंबरपासून कन्या राशीत
  • शनि- मकर राशीत वक्री
  • राहु- मेष राशीत
  • केतु- तूळ राशीत
  • चंद्र- प्रत्येक सव्वा दोन दिवसांनी रास बदलणार

वृषभ - या राशीच्या लोकांना या 3 ग्रहांची स्थिती लाभदायी ठरेल. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. व्यावसायिक जीवनही चांगले राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यापार्‍यांनाही या काळात फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. असं असलं तरी सप्टेंबर महिन्यात आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन - या राशीच्या लोकांना येत्या महिन्यात यश मिळेल. या महिन्यात तुम्हाला प्रमोशनशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना नशीबाची साथ मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल नाही. कुटुंबात काही चढ-उतार होऊ शकतात. 

कर्क - सप्टेंबर महिना या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात लाभ आणि यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना या काळात धन-समृद्धी मिळू शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात व्यावसायिकांनाही फायदा होईल. कंपनीसाठी हा काळ लाभदायक आहे. तुम्ही दीर्घकाळ उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. जोडीदार आणि तुमच्यातील जवळीक वाढेल. या काळात अध्यात्माकडे लक्ष वाढेल.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
September 2022 3 Grah Gochar Positive Impact On Four Rashi
News Source: 
Home Title: 

September 2022: सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळतील शुभ परिणाम

September 2022: सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळतील शुभ परिणाम
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळतील शुभ परिणाम
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, August 26, 2022 - 18:07
Request Count: 
1
Is Breaking News: 
No