Pune Rape Case : ‘बसमध्ये सर्रास लॉजिंग सुरूंय, म्हणूनच..!’ वसंत मोरे यांचा खळबळजनक दावा

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी बस स्थानकातील कार्यालयाची तोडफोड करत गंभीर आरोप केलेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 26, 2025, 07:10 PM IST
Pune Rape Case : ‘बसमध्ये सर्रास लॉजिंग सुरूंय, म्हणूनच..!’ वसंत मोरे यांचा खळबळजनक दावा

Pune Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. या बस स्थानकात ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. 26 वर्षीय तरुणीला गाडीत बसवून देतो असं म्हणत तिला बसमध्ये बसवले आणि आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेचे तीव्र पडसाद देखील उमटले आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते वसंत मोरे स्वारगेट बस स्थानकात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना, जर पोलीस आतल्या बाजूला येऊ शकत नाहीत तर त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी केबिन का दिले आहे? मी जेव्हा आतल्या बाजूला गेलो तर तिकडे चार शिवशाही बस उभ्या आहेत. चार बसेसचं या लोकांनी लॉजिंग केलं आहे. म्हणजे याच नालायक लोकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थित इथे रोज बलात्कार होतात असं म्हणत वसंत मोरेंनी गंभीर आरोप केलेत. 

'दररोज या ठिकाणी असे प्रकार होतात'

वसंत मोरे पुढे म्हणाले की, तिकडे चार बस उभ्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटे पडलेली आहेत. याचा अर्थ काय घ्यावा. इथे जो प्रकार घडला आहे, तो दररोज होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये येथील कर्मचाऱ्यांचा हात आहे. जर या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत तर मग हे सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करत आहेत? येथे असणारे कर्मचारी केबिन उघडायला आहेत का? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. 

तर ही घटना घडली त्याच वेळी ती शिवशाही बस त्याच सुरक्षा कार्यालयाच्या समोर उभी होती. मग त्या ठिकाणी असणारे सुरक्षा कर्मचारी काय करत होते. कर्मचाऱ्यांचे काम हे आगाराची सुरक्षा करण्याचे आहे. जर सुरक्षा कार्यालयाच्या बाहेर जर एखाद्या तरुणीवर बलात्कार होत असेल तर धक्कादायक घटना आहे. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. 

प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश

बसस्थानक परिसरातील जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने या बसेस एक प्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनतात. त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या निर्लेखित केलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत! असे निर्देश यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.