Tulsi Vastu Tips : तुळशी वृंदावन शेजारी कधीही ठेवू नये 'या' गोष्टी, घडतील अशुभ घटना
Tulsi : हिंदू धर्मामध्ये पूजाविधीमध्ये तुळशीच्या पानाला खास महत्त्व असतं. त्यामुळे भारतात अनेक घरांमध्ये तुळशीचं वृंदावन दिसून येतं. ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) तुळशीच्या वृंदावनजवळ काही गोष्टी ठेवल्यास त्या अशुभ समजल्या जातात.
Tulsi Vivah 2022 : तुळशीला (Tulsi) हिंदू धर्मात आणि आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं.
कार्तिक महिन्यात घरामध्ये तुळशीचं रोप लावून त्याची लक्ष्मीच्या रूपात पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असं म्हटलं जातं. कार्तिक महिन्यात 5 नोव्हेंबर 2022 शनिवारी तुळशीचं लग्न (Tulsi Vivah 2022) लावण्यात येणार आहे. हिंदू धर्मामध्ये पूजाविधीमध्ये तुळशीच्या पानाला खास महत्त्व असतं. त्यामुळे भारतात अनेक घरांमध्ये तुळशीचं वृंदावन दिसून येतं. ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) तुळशीच्या वृंदावनजवळ काही गोष्टी ठेवल्यास त्या अशुभ समजल्या जातात. त्यामुळे जर तुम्ही खालील पैकी कुठल्याही गोष्टी ठेवल्या असतील तर त्या लगेच बाजूला काढा. (Tulsi Vivah 2022 Tulsi Vastu Tips nmp)

मोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी घरं खूप मुश्किलने मिळतं. अशात छोट्या घरांमध्ये अनेक गोष्टींना जागा नसते. मग ती आपल्याला बनवावी लागते. अशावेळी जर तुम्ही तुळशीच्या वृंदावनशेजारी शूट आणि चप्पल ठेवली असेल तर लगेचच त्यांना नवीन जागा करा. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीजवळ शूज आणि चप्पल ठेवल्यास घरामधील सुख-समृद्धी नाहीशी होते.


