स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन

Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.  ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.  

| Dec 01, 2024, 14:32 PM IST
1/7

जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीय व्यक्तींनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय होतं. अध्यक्षपदी निवड झालेले जय शाह हे  आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ऑगस्ट महिन्यात आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु असताना जय शाह यांचे नाव आघाडीवर होते. 

2/7

आयसीसी अध्यक्षपदासाठी एकूण 16 सदस्य मतदान करतात. शहा यांना निवडणूक जिंकण्यासाठी 9 मतांची गरज होती. जय शहा यांच्या बाजूने बहुमतापेक्षा जास्त मतं होती, त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणीही उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे अखेर जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

3/7

जय शाह यांची कारकीर्द :

जय शाह यांनी 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एंट्री घेतली यावेळी त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद भूषवले. त्यानंतर 2015 साली जय शाह यांनी बीसीसीआयमध्ये सहभागी घेतला. नंतर सप्टेंबर 2019 मध्ये ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव झाले आणि आता 2024 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत. 

4/7

जय शाह यांचं वय 35 वर्ष आहे. जय शाह यांनी ICC च्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यावर आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे स्वागत केले आणि आता जागतिक क्रिकेटच्या नवा अध्यायाला सुरुवात होतं आहे असे म्हटले.

5/7

जय शाह यांना किती मानधन मिळणार?

आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी असणार आहे. जय शाह यांनी बीसीसीआयमध्ये सचिव, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष ही मोठी पदे सांभाळली आहेत. आयसीसीचे अध्यक्ष असणाऱ्या जय शाह यांना पगार दिला जाणार नाही. पण त्यांना प्रवासाचा खर्च, बैठकांसाठी आणि खर्चासाठी आयसीसीकडून भत्ता मिळतो.   

6/7

आयसीसीच्या बैठकांसाठी अध्यक्षांना बऱ्याचदा विदेशात जावं लागतं आणि त्यावेळी प्रत्येक दिवसासाठी त्यांना 1000 डॉलर्स म्हणजेच दिवसाला 82 हजार रूपये मिळतात. तसेच राहण्यासाठी आलिशान हॉटेल रूम आणि विमानात बिझनेस क्लासची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते.  

7/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयचे माजी सचिव आणि व्यावसायीक जय शाह यांची एकूण संपत्ती 125 ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.