तुम्हालाही कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय? मग दुष्परिणाम आधीच जाणून घ्या!

अनेकदा पीठ मळून त्याच्या चपात्या करुन झाल्यावर ते पीठ उरते. अशा वेळी महिला उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि आपल्याला हव्या त्या वेळी त्या पीठाच्या पुन्हा चपात्या करतात. मात्र कणिक मळून फ्रीजमध्ये अधिक काळ ठेवल्यावर ते पीठ खाण्यायोग्य राहत नाही. तसेच, अशा पीठाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

Feb 27, 2025, 13:17 PM IST

अनेकदा पीठ मळून त्याच्या चपात्या करुन झाल्यावर ते पीठ उरते. अशा वेळी महिला उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि आपल्याला हव्या त्या वेळी त्या पीठाच्या पुन्हा चपात्या करतात. मात्र कणिक मळून फ्रीजमध्ये अधिक काळ ठेवल्यावर ते पीठ खाण्यायोग्य राहत नाही. तसेच, अशा पीठाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

 

1/7

कित्येकदा वेळा महिला रात्री उरलेलं कणिक फ्रीजमध्ये ठेवून त्या पिठापासून सकाळी चपात्या किंवा रोट्या बनवतात वेळ वाचवण्यासाठी लोक पीठ एकदाच मळून घेतात आणि त्यातून बऱ्याच वेळी चपात्या बनवतात.  

2/7

कणिक अधिक काळ ठेवल्यास ते नैसर्गिकपणे आंबण्यास सुरु होते. उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे पीठात बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊन पीठ खराब होते. तसेच, अशा पीठपासून बनलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे अपचन, गॅस किंवा ऍसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.  

3/7

सामान्य खोलीच्या तापमानात, कणिक केवळ 3 ते 4 तास ताजे राहू शकते. खास करुन उन्हाळ्यात एकदा मळलेलं पीठ 6 ते 7 तासांत खराब होऊ शकते. अशा पीठाची चपाती खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.    

4/7

काही लोक पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी त्या पीठापासून चपात्या बनवतात. जर कणिक फ्रीजमध्ये अधिक काळ ठेवले तर त्यातील नैसर्गिक स्टार्च खराब होण्याची शक्यता असते.   

5/7

फ्रीजमध्ये कणिक जास्त वेळ ठेवल्यास त्याचा रंग बदलू लागतो. पीठ हलक्या राखाडी किंवा हिरव्या रंगाचे दिसू लागते. बदललेला रंग हे पिठातील बॅक्टेरिया किंवा बुरशीचे लक्षण आहे. अशा वेळी अशा पीठाचे सेवन करणे टाळावे.  

6/7

जर तुम्हाला कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असेल तर 24 तासांच्या आत पीठ वापरा. 24 तासांपेक्षा जास्त काळ पीठ ठेवल्यास त्याच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.  

7/7

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)