आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित

www.24taas.com,लंडन
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केलं आहे. ऑलिंपिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे भारतीय अॅथलिट्सना ऑलिम्पिकच्या इव्हेंटमध्ये सहभागी होता येणार नाही. या निर्णयामुळे भारताची ऑलिम्पिक स्तरावर चांगलीच नाचक्की झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आता आयओसीच्या बैठकीलाही उपस्थित राहता येणार नाही.
दरम्यान या निर्णयाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. आयएओकडून मिळणारा निधीही बंदही होईल. याचा परिणाम आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स यावर होण्याची शक्यता आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केल्याचे याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुका घेण्यात आयओएला अपयश आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
IOC suspends Indian Olympic Committee
Home Title: 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित

No
155780
No
Authored By: 
Surendra Gangan