'छोटा पुढारी' पुन्हा 'मोठ्या ब्रेकनंतर' परतला

आपल्या बोलण्याचा लहेजा आणि पुढारी शैलीमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेला आणि सोशल मीडियात झळकलेला, घनश्याम दरवडे या छोटा पुढारी पुन्हा एकदा मोठ्या ब्रेकनंतर सोशल मीडियात आला आहे. 

Updated: Jan 31, 2016, 06:06 PM IST
'छोटा पुढारी' पुन्हा 'मोठ्या ब्रेकनंतर' परतला title=

अहमदनगर / श्रीगोंदा : आपल्या बोलण्याचा लहेजा आणि पुढारी शैलीमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेला आणि सोशल मीडियात झळकलेला, घनश्याम दरवडे या छोटा पुढारी पुन्हा एकदा मोठ्या ब्रेकनंतर सोशल मीडियात आला आहे. 

व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

यावेळी धनश्याम हा मोटारगाडीतून गावोगावी फिरताना दिसतोय. घनश्यामला स्थानिक लोकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत, त्याला धनश्यामने उत्तर देखील दिली आहेत. 

यावेळी आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कलेक्टर व्हायचंय, या भूमिकेवर घनश्याम ठाम दिसतोय, मात्र कलेक्टर होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, असं असताना घनश्याम शाळेत कमी आणि दौऱ्यावर जास्त दिसतोय.

राजकारण नको म्हणताना घनश्यामचे पाय राजकारणाकडे दिसतायत. एकंदरीत बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत हेच खरं...

पाहा काय म्हणतायत, छोटे पुढारी

नेते... लक्ष राहु द्या...(छोटा पुढारी)

Posted by Rakesh Kote Patil on Thursday, January 28, 2016