अमृतसर : भारत - पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध दिवाळीच्या मुहूर्तावर थोडे सैल झालेले दिसले.
बुधवारी कराचीमध्ये पाकिस्तानी हिंदुंच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रदान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानातील हिंदुंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. दिवाळीचा सण अंधारातून उजेडाकडे घेऊन जातो, असं नवाझ शरीफ यांनी शुभेच्छा देताना म्हटलं.
तर वाघा बॉर्डरवर गेल्या अनेक दिवसांपासून टाळण्यात आलेलं मिठाईचं आदान-प्रदानही यानिमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं. सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या अमृतसर सेक्टर कमांडंट बिपुल बीर गुसैन यांनी पाकिस्तान रेंजर विंग कमांडर लेफ्टनंट कर्नल बिलाल अहमद यांना झिरो लाईनवर मिठाई दिली.
या निमित्तानं दोन्ही देशांतील सैनिकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि आपला आनंद एकमेकांसोबत वाटला.
BSF and Pakistan Rangers exchange sweets at Wagah Border on the occasion of Diwali. pic.twitter.com/pIOBPkGNNC
— ANI (@ANI_news) November 11, 2015
उल्लेखनीय म्हणजे, ईदच्या निमित्तानं वाघा बॉर्डरवर बीएसएफनं पाठवलेली मिठाई स्वीकारण्यास पाकिस्ताननं नकार दिला होता. तर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानंही दोन्ही देशांमध्ये मिठाई आणि शुभेच्छांचं आदान-प्रदान झालं नव्हतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.