जाट समुदायाचे आंदोलन चिघळले
www.24taas.com, चंदीगढ
जाट समुदायाने ओबीसी कोट्यांतर्गत सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हरियाणा बंद आंदोलन केले. हे आंदोलक चिघळले. दरम्यान पोलीस यांच्यात झालेल्या वादातून एक तरुण ठार, तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
निमलष्करी दलाची पथकांसह सुमारे अडीच हजार जणांचा फौजफाटा संपूर्ण जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर आणखी सहा पथके लवकरच जिल्ह्यात पोचणार आहे. गरज लागल्यास लष्कराचीही मदत घेण्यात येणार आहे, असे हरियाणाचे पोलिस महासंचालक राजीव दलाल यांनी सांगितले. ओबीसी कोट्यांतर्गत सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जाट समुदायाचे आंदोलन सुरू आहे.
संतप्त आंदोलकांनी सदर तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देऊन मृतदेह माय्यार गावाजळील रेल्वेरुळावर ठेवला. सध्या अटकेत असलेल्या जाट समुदायाच्या नेत्याची शुक्रवारी सुटका करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्याची सुटका करण्यास सरकार अपयशी ठरले. त्यामुळे जाट समुदायाने काल रेल्वे रोको आंदोलन केले.
आंदोलनाचा एक भाग म्हणून आंदोलकांनी आज झाडे आणि दगडे टाकून हिसार- दिल्ली महामार्ग अडविला. त्याचबरोबर दिल्ली, जिंद, भिवानी, चंदीगढ आणि हिसार- दिल्ली रेल्वे वाहतूकही अडविण्यात आली. त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम दिसून आला.
जाट समुदायाचे आंदोलन चिघळले
