बापरे मोटरमनचं 'हे' चाललंय काय? लोकल मध्येच थांबवली अन्,...VIDEO शेअर करुन प्रवाशांनी विचारले प्रश्न

मोटरमनने अचानक रेल्वे ट्रॅकवर रेल्वे थांबवल्याने प्रवाशी गोंधळले. पाहा नेमकं काय झालं? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 27, 2025, 01:53 PM IST
बापरे मोटरमनचं 'हे' चाललंय काय? लोकल मध्येच थांबवली अन्,...VIDEO शेअर करुन प्रवाशांनी विचारले प्रश्न

सोशल मीडियावर दिवसेंदिवस व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ तुम्हाला पोट धरुन हसवतात तर काही तुम्हाला अंर्तमुख करायला लावतात. पण सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुंबईतील लोकल ट्रेन अचानक ट्रॅकवर थांबली. सुरुवातीला ही ट्रेन लोकलवर का थांबली असा प्रश्न प्रवाशांना पडला. पण नंतर लक्षात आलं की, मोटरमननेच लोकल थांबवली. 

तर झालं असे की, मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने चक्क लोकलच थांबवली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये स्पष्ट दिसतंय की, मोटरमन रेल्वे ट्रॅकवर उतरुन लघवी केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Udaykumar IR Shiroorkar (@udaykumarshiroorkar)

या व्हिडीओमध्ये मोटरमन ट्रेन थांबवून रेल्वे रूळांवर लघुशंका करताना दिसत आहे. त्यानंतर मोटरमन पुन्हा आपल्या केबीनमध्ये जाऊन गाडी सुरू करतो. मोटरमनने अचानक गाडी थांबवली असल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परंतु कोणत्याही प्रवाशाने याबाबत तक्रार केली नाही. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले .हा जुना व्हिडीओ असला तरी सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडीओलवरुन मोटरमन यांच्या नैसर्गिक विधींबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.