धावपळीच्या जगात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाचा ठरतो. आपण जे अन्न ग्रहण करतो ते स्वच्छ आणि साफ असणं गरजेचं आहे. आता व्हिडीओ जो समोर आला आहे. त्यावरुन आपण जो आहार खातो तो किती अस्वच्छ आणि खराब आहे हे अधोरेखित होते.
उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांकडून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Ulhasnagar Vegetable Washed In Dirty Water। भाजीविक्रेत्याकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ? पाहा व्हिडिओ#ulhasnagar #vegetableswashed #zee24taas #dirtywater #zee24taas pic.twitter.com/s8ScL63xLz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 27, 2025
उल्हासनगरच्या कॅम्प2मधील खेमाणी परिसरात हे भाजी मार्केट आहे. या मार्केटमधल्या पोस्ट ऑफिससमोरच्या उघड्या असलेल्या गटाराच्या पाण्यात ही भाजी बुडवूत धुत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एवढंच नव्हे तर भाजी विक्रेते देखील गटाराचे पाणी बादलीत घेतात आणि तेच पाणी भाज्यावर मारताना दिसतात. या भाज्यांची विक्री देखील करत असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शरीर सुदृढ राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करतात. पण जर अशा पद्धतीने गटाराच्या पाण्यात धुतलेली भाजी आपण खाल्ली तर त्याचा शरीरावर नक्कीच दुष्परिणाम होईल यात शंका नाही. याचा शरीराला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल यात शंका नाही. या प्रकरणात तेथीस भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.