संतोष देशमुख प्रकरणी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम लढणार खटला

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आलीय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 26, 2025, 08:38 PM IST
संतोष देशमुख प्रकरणी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम लढणार खटला

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आलीय. तसंच सुरेश धसांच्या शिष्टाईनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान मागण्या मान्य केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. 

लेखी आश्वासनानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलंय. सुरेश धस यांच्या शिष्टाईनंतर मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. परत तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. 

संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

दरम्यान गावकऱ्यांनी केलेल्या 7 प्रमुख मागण्यांपैकी 1 मागणी सरकारनं पूर्ण केलीय. संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मस्साजोगमधील गावकऱ्यांनी केलेल्या सात मागण्या कोणत्या? 

1.केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन व PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करा.

2.फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा

3.सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती. ही मागणी मान्य करण्यात आलीय

4.सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणे.

5.वाशी पोलीस स्टेशनचे PSI घुले, पो.कॉ. दिलीप गित्ते, गोरख व दत्ता बिक्कड, हेड कॉ. यांचे CDR तपासून यांना सहआरोपी करा.

6.आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करावे.

7. घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी PSI राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.

सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आल्याचं गावकऱ्यांनी सांगितसलंय. तसंच आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.