Pune Swargate Rape: विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर बलात्काराच्या घटनेनं हादरल आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आहे. यानंतर नराधम आरोपी फरार असून पोलिसांची आठ पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरु असल्याचा आरोप होऊ लागलाय. या बसेसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र आणि दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निमित्तानं रिकाम्या बसेसचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी. स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा कार्यालय फोडलं. बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. बसस्टँडवर उभ्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाले. त्यामुळं स्वारगेट बस आगारातील असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यातच स्वारगेट बसस्टँडच्या आवारात भंगार शिवशाही बसेस तिथं उभ्या आहेत. तरुणीवरील अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर आगारात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये महिलांचे कपडे आढळलेत.
शिवशाही बसमध्ये महिलांचे कपडे आले कसे असा सवाल वसंत मोरेंनी उपस्थित केलाय. स्वारगेट बसस्टँड किती असुरक्षित आहे हे तरुणीवरील बलात्कारानं अधोरेखित झालंय. त्यातच जुन्या भंगार बसेसचा वापर अनैतिक धंद्यासाठी केला जातोय का असा सवाल उपस्थित केला जातोय. फक्त कपडेच नाही तर कंडोम, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र सापडल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने कारवाई करत 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन केले आहे. तसेच बसस्थानक परिसरातील निर्लेखित केलेल्या अर्थात भंगारात काढलेल्या जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या आहेत. या भंगार बसेस कडे दुर्लक्ष होत असल्याने या बसेस एक प्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनतात आणि त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या भंगारात काढलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत असे निर्देश यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.