दुर्दैवी! नाशिकमध्ये लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

नाशिकमध्ये लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू. इंदिरानगरकडे जाताना घडली घटना.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 25, 2025, 01:19 PM IST
दुर्दैवी! नाशिकमध्ये लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

Nashik Accident : नाशिकच्या इंदिरानगर येथील लायब्ररीमधून पुस्तक घेऊन जाताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने रस्त्याच्या खटकीहून दुचाकी खाली उतरल्याने दुचाकीसह तोल जाऊन पाणीपुरीच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जाताना घटना घडलीय. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. वेदांत गुळसकर असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

कसा झाला अपघात? 

वेदांत गुळसकर हा सायंकाळी 5.30 वाजता दुचाकीने इंदिरानगर येथे लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात असताना वडाळा-पाथर्डी रोडवर पाठीमागून एक अनोळखी वाहन येत होते. या वाहनाने दुचाकीला कट मारला. यामुळे वेदांत गुळसकरचा दुचाकीसह तोल गेल्याने दुचाकी रस्त्याच्या खटकीहून खाली उतरली. वेदांतच्या गाडीचा वेग अधिक असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन वेदांतची दुचाकी आदळली. जोरदार धडक बसल्याने वेदांतच्या मानेत दोन्ही बाजूने काचा घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. परंतु मोठ्या प्रमाणात रक्त श्राव सुरू असल्याने त्याला उचलण्याची कोणी हिंमत केली नाही. त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी वेदांतला मदत केली. वेदांतला तिथे जवळ असणाऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. 

मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेदांत गुळसकर हा पवननगर येथील मराठा हायस्कूल येथे तो दहावीचे शिक्षण घेत होता. वेदांतने दहावीचा पहिला पेपर दिला होता. त्यानंतर तो दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरीता तो इंदिरानदर येथील लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यास गेला होता आणि यातच वेदांतचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 

वेदांतचे वडील हे राज्य परिवहन मंडळात वाहक पदावर आहेत. तर आई गृहिणी आहे. वेदांतला एक लहान भाऊ आहे. वेदांत दहावीमध्ये शिकत होता. त्याच्याकडे वाहन चालविण्यासाठी पक्का परवाना देखील नव्हता. तरी देखील तो दुचाकी घेऊन लायब्ररीमध्ये पुस्तक आणण्यासाठी दुचाकीवर गेला होता. अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. सध्या पालकांचा लहान मुलांना वाहन चालविण्यासाठी देण्याकडे जास्त कल आहे. मात्र, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा देखील एक गुन्हा आहे.