Crime News In Marathi: झारखंडच्या बोकारो जिल्हाअंतर्गंत असलेल्या पेटरवार गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतकंच नव्हे तर त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. नऊ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी हा मुलीच्याच ओळखीचा आहे. आरोपीचा पाहताच पोलिसही हादरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिस नेमकं काय घडलं होतं याचा तपास करत असताना पुरावे गोळा करत होते. त्याचवेळी त्यांच्या हाती असे काही पुरावे लागले ज्यामुळं पोलिसही सून्न होते. बोकारोचे एसपी मनोज स्वर्गियारींनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देण्यात आली. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या 8 वर्षांची मुलगी आणि मुलासोबत नातेवाईकांच्या लग्नात गेले होते.
कुटुंबीयांनुसार, 5 मे 2024 रोजी रात्री जवळपास 9 वाजण्याच्या सुमारास तरुणी मुलगी लग्नाच्या सोहळ्यातून बेपत्ता झाली होती. शोध घेतल्यानंतरही ती तरुणी सापडली नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या सुमारास मृतदेह गावाच्या बाहेरच्या झाडा-झुडपात सापडला होता. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले.
एसपी मनोज स्वर्गियारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आईची फेसबुकच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत बाबू दास मुर्मूसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्यात अनैकित संबंध निर्माण झाले. मुलीला आईच्या या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती होती आणि तीला हे संबंध मान्य नव्हते. त्यामुळं तिची आई आणि प्रियकराने तिच्याविरोधात कट रचला.
आरोपींनी लग्न समारंभात असलेल्या शिवनारायण बेसरा याला दारू आणि पैशांचे लालच देऊन मुलीसोबत अत्याचार केले. त्यानंतर बाबू दास मुर्मू यानेही मुलीसोबत अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करुन फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी दोन मोबाइल, एक सिम आणि एक बाइक जप्त करण्यात आली आहे.