Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर दिवसभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
27 Feb 2025, 10:05 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत खासगी शाळा सुरू करण्यासाठी 127 प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यातील 106 प्रस्ताव हे इंग्रजी माध्यमाचे असून मराठी माध्यमाचे केवळ 15 आहेत. तर मुंबईत मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे 2 प्रस्ताव पात्र ठरलेत
27 Feb 2025, 09:58 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: आमदार सुरेश धस यांना पुन्हा डावललं?
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा झाली. मात्र यात आमदार सुरेश धस यांना डावललं आहे. धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झालीय. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत. राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 11 समित्या आल्या आहेत. या समित्यांवर भाजपचं अध्यक्षांची निवड करतं. त्यामुळे सुरेश धस यांना डावलून भाजपानं मुदंडा यांना नेमलं. त्यामुळे भाजपानं धसांना यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा रंगली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं समितींवर नेमणुका केलेल्या नाहीत. दरम्यान, यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणा-या नियुक्त्यांमध्ये सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली होती.
27 Feb 2025, 09:41 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बिहारच्या मंत्रिमंडळात सात नव्या चेह-यांचा समावेश
राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या 26वर. बिहारच्या मंत्रिमंडळात युतीतील घटक पक्षाचं सरकारमध्ये अंतर्गत बदल
27 Feb 2025, 09:41 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: 29 हजार माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश
29 हजार माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला पक्ष प्रवेश सोहळा. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
27 Feb 2025, 09:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात 5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी भूगर्भात 16 किलोमीटर आत हादरे.
27 Feb 2025, 09:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: स्वारगेट बलात्कार प्रकरणः 'ती' बस आता फॉरेन्सिक लॅबकडे
स्वारगेट बस स्थानकात ज्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार झाला ती बस आता पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे बस नेण्यात आली आहे. काल रात्री ही बस घटनास्थळावरून हलवण्यात आली
27 Feb 2025, 08:38 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं होतं. या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावरील अनेक सुणावण्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मागील 17 महिन्यांपासून हे प्रकरण कोर्टात आलं नव्हतं. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
27 Feb 2025, 08:09 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: अमोल मिटकरींचा सत्तारांच्या PA वर आरोप
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा मंत्र्यांचे पीए आणि ओएसडीवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी थेट तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए मोगल यांच्यावर आरोप केलाय. अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या सिनेटसाठी मोगल यांनी गैरव्यवहार केल्याचं मिटकरी म्हणाले. मिटकरींच्या या आरोपांमुळे आता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. जेव्हा पैसे मागितले होते तेव्हाच आरोप का केले नाही. याबाबत अमोल मिटकरींना विचारणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. तर मिटकरींनी मुख्यमंत्र्यांकडे लखी तक्रार करावी, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलीय.
27 Feb 2025, 08:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता?
स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आले आहेत. तर काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या ही संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
27 Feb 2025, 07:01 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईच्या ट्रॉम्बेमधून 21वर्षीय तरुणीला शेअर बाजारातील सायबर फसवणुकी प्रकरणी अटक केली..या तरुणीला बेकायदेशीर व्यवहारबाबत तसेच कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.