Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर दिवसभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
27 Feb 2025, 13:37 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: कॉपी देताना नायब तहसीलदारांना रंगेहात पकडलं
नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडले. अनिल तोडमल यांना रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव. बारावी पेपर मध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील घटना..
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. संबंधित नायब तहसिलदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष.
27 Feb 2025, 13:08 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा मुदतबाह्य असल्याचं समोर आलं. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील ६ व्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असतानाही ते कार्यान्वित ठेवण्यात आलेत.अग्निशामक यंत्र ९ सप्टेंबर २०२४ रोजी रिफिल करणे आवश्यक होते मात्र ते अद्याप केले गेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात येणा-या नागरिकांचा आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.
27 Feb 2025, 13:07 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: बीडमधील पोलिसांची ओळख आता नावानचं होणार
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातिवाद समोर आला. पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचं वारंवार बोलंले गेलं. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांना आता पहिल्या नावानचं ओळखलं जाणार असल्याचे आदेश काढले आणि त्याची अंमलबजावणी आता 1 मार्चपासून होणार आहे.
27 Feb 2025, 12:16 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: अलिबाग बस स्थानकासमोर भीषण अपघात
अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसेमध्ये चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. जयदीप बना असे मृत तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बस स्थानकात जोरदार राडा घातलाय. जमावाने एसटीच्या काचा फोडल्या आहेत
27 Feb 2025, 11:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: गृहराज्यमंत्री योगेश कदमांची स्वारगेट एस टी स्टँडला भेट
गृहराज्यमंत्री योगेश कदमांची स्वारगेट एस टी स्टँडला भेट . घटनास्थळाची पाहणी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार सविस्तर अहवाल
27 Feb 2025, 11:38 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातील प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन
पुण्यातील प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना फोन. पुण्यातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांचं उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक. कालचा घाणेरडा प्रकार होता हे बघून जीव जळतोय आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आ
27 Feb 2025, 11:25 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पोलिसांना आरोपी कसा सापडत नाहीः तृप्ती देसाईंचा आरोप
27 Feb 2025, 11:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरणः स्वारगेट डेपो परिसरात तृप्ती देसाईंचे आंदोलन
पुण्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी दिली आहे. तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वारगेट एसटी स्टँड परिसरामध्ये तृप्ती देसाई या आंदोलनासाठी उतरल्या आहेत.
27 Feb 2025, 10:41 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून आज आरोप पत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हे आरोप पत्र दाखल केले जाईल. या आरोप पत्रातून नेमके सीआयडीच्या तपासातून काय निष्पन्न झाले ते समोर येईल. या आरोप पत्रात कोणाचे नाव ठेवले जाईल हे समोर येईल
27 Feb 2025, 10:10 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सहा दिवसानंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू
सहा दिवसानंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील एसटी बस चालकांच्या तोंडाला कर्नाटक मध्ये काळ फासल्याच्या घटनेनंतर गेली सहा दिवस बंद होती महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद होती. अखेर कोल्हापूर आगारातून कर्नाटक साठी बसेस सुरु झाल्या आहेत.