Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर दिवसभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
27 Feb 2025, 20:45 वाजता
50 खोके घेऊन सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
50 खोके घेवून तिकडे डुबकी मारली म्हणजे गद्दाराची पाप धुतले जात नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.
27 Feb 2025, 20:02 वाजता
पोलादपूरच्या लाचखोर तहसीलदारावर गुन्हा दाखल
रायगडमधील पोलादपूरच्या लाचखोर तहसीलदारावर गुन्हा दाखल झालाय. अडीच लाख रूपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल घोरपडे असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय.
27 Feb 2025, 19:21 वाजता
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची शोध मोहिम थांबवली
पुण्याच्या स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची शोध मोहिम अखेर थांबवली. अंधार पडल्यानंतर पोलीस कर्मचारी ऊसाच्या फडातून बाहेर. गेली दोन तासापासून पुणे पोलिसांच्या विविध टीमकडून दत्ता गाडेची ऊसाच्या शेतात सुरू असलेली शोध मोहिम अंधार पडल्यानंतर अखेर थांबवली आहे.
27 Feb 2025, 18:48 वाजता
परभणीत 10 वर्षीय मुलीवर अत्याचार, दोन नराधमांना पोलिसांकडून अटक
परभणीत एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी दोघा नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलीये. अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय.
27 Feb 2025, 17:03 वाजता
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्रपणे 'सिंहस्थ प्राधिकरण' स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला त्याबाबत निर्देश दिले आहेत. हा सिंहस्थ कुंभ'डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ' म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. प्रयागराज व उज्जैनच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण झाल्यास महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण कमी होऊन सिंहस्थासाठी स्वतंत्र अमंलबजावणी करणारी यंत्रणाच आता उभी राहणार आहे. या प्राधिकरणावर स्वतंत्र आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे..
27 Feb 2025, 17:00 वाजता
बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारशी सुचवणारा अहवाल दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने हायकोर्टात सादर केला आहे. यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या आहेत. अहवालावर दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.
27 Feb 2025, 16:57 वाजता
मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा मुदतबाह्य असल्याचं समोर आलं. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील ६ व्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असतानाही ते कार्यान्वित ठेवण्यात आलेत.अग्निशामक यंत्र ९ सप्टेंबर २०२४ रोजी रिफिल करणे आवश्यक होते मात्र ते अद्याप केले गेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात येणा-या नागरिकांचा आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
27 Feb 2025, 15:59 वाजता
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. सीआयडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे.
27 Feb 2025, 14:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही व जीपीएस बंधनकारक करणार
सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही व जीपीएस बंधनकारक करणार.धुळखात भंगारात पडलेल्या बसेस साठी दिड महिन्याचा अवधी दिलाय. अश्या काही घटना घडू नये यासाठी अजून काही करता येतील का याची चर्चा केली, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
27 Feb 2025, 13:49 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: स्वारगेट बस मधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी CMO कार्यालय आणि महिला आयोग यांना संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आढावा घेत आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये ही बैठक सध्या सुरू असून या बैठकीला शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.