कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असून धोक्याच्या पातळीजवळ आलीय. पंचगंगा नदीची धोकापातळी 43 फूट असून सध्या नदी ४२ फुटांवरून वाहत आहे.
पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता
जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्गावर पाणी आलं असून कोकणाला जोडणारे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-राजापूर आणि कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढून जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
धरणं भरली
राधानगरी धरणदेखील सुमारे 91 % भरले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Heavy rain in Kolhapur
News Source:
Home Title:
कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर

No
No
Section:
Facebook Instant Article:
Yes
Mobile Title:
कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर