नाशिकच्या कुंभमेळ्यावरुन महायुतीत कोल्ड वॉर सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आज फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी होती. तर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजनांनी देखील दांडी मारली होती.
- नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक
- बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवारांची गैरहजेरी
- दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरम्यान या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी कुंभमेळासंदर्भात नाशकात घेतलेल्या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित नव्हते.
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते.
तर 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजन गैरहजर होते
भाजपच्यी बैठकीची तयारी करायची होती त्यामुळे गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिलं होतं...
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली.. त्यावर एक नजर टाकुयात...
- गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन
- प्रयागराज महाकुंभला भेट देऊन आलेल्या अधिकाऱ्याकडून व्यवस्थेचे सादरीकरण
- नियोजन आणि समन्वयासाठी प्रशासन कुंभ प्राधिकरण स्थापन करणार
- कुंभमेळाबाबतचे विधेयक अधिवेशनात मांडलं जाणार
- AI चा अधिकाधिक वापर करावा, तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप द्यावं
- संपूर्ण नियोजनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी सौजन्य पाळावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. दरम्यान या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविकांची नाशकात मोठी गर्दी होणार आहे.