ठाण्यात एका तरुणाने मित्राच्या कानाचा चावा घेत कान गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पीटीआयशी संवाद साधताना, पार्टीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती दिली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना बुधवारी उपनगरातील पातलीपाडा परिसरातील एका पॉश हाऊसिंग सोसायटीत घडली. श्रवण लेखाने दावा केला की, तो आणि आरोपी विकास मेनन त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना भांडण झाले.
32 वर्षीय श्रवणने आरोप केला आहे की, 32 वर्षीय मेननने त्याच्या कानाचा चावा घेतला आणि त्याचा काही भाग गिळून टाकला. घटनेनंतर श्रवणला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मेननवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 117 (2) अंतर्गत गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, असं अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.
14 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवडच्या देहू रोड परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या वादात एका 37 वर्षीय व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, विक्रम गुरुस्वामी रेड्डी आणि त्याचा मित्र नंदकिशोर यादव रस्त्याच्या कडेला यादवच्या भाचीचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी काहीजणांनी त्यांना जाब विचारला.
या ग्रपुने रस्त्याच्या कडेला वाढदिवस साजरा करण्यास आक्षेप घेतला आणि याच वादातून हाणामारी झाली ज्यामध्ये नंदकिशोर यादव जखमी झाला. त्यानंतर रेड्डी मध्यस्थी करण्यासाठी आला. यावेळी एका आरोपीने रेड्डीवर गोळीबार केला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला.
मंगळवारी दुसऱ्या एका घटनेत, रविवारी रात्री उशिरा कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ गुन्हेगारांच्या टोळीने पूर्वीच्या वैमनस्यातून तलवारीने वार करून एका व्यक्तीची हत्या केली. मृत तरुणाचं नाव गौरव अविनाश थोरात (22) असे आहे आणि कोथरूड पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित संशयितांना अटक केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत सुरू असलेल्या गोळीबार प्रकरणाच्या आणखी एका तपासात, पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी गूढ गोळीबार प्रकरण उलगडले आणि पीडितेच्या चुलत भावासह दोघांना अटक केली. पीडिताचा चुलत भाऊ, 42 वर्षीय अनंत सिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका आरोपीने त्याचा सहकारी रोहित पांडेसह 12 लाखांच्या कराराच्या वादातून हा हल्ला घडवून आणला.