Why Do Ants Walk In A Line : आपण नेहमीच पाहतो की मुंग्या असतात त्या कधीही एका रेषेत चालतात. पण त्याचं कारण काय नेमकं असं का घडतं? अनेकदा कार्ट्युनमध्ये मुंग्यांची फौज दाखवण्यात येते आणि जणू काही त्या ज्या प्रमाणे चालतात त्याप्रमाणे त्या परेड करतात की काय असा प्रश्न उपस्थित राहतो. पण तुम्ही कधी विचार केला का की अखेर मुंग्या अशा का चालतात? आता त्या मागचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
मुंग्या या घोळक्यामध्ये राहतात आणि त्या जणू एका सिस्टमच्या अंतर्गत काम करतात. सरळ रेषेत चालणं हा त्यांच्या सवयीचा एक भाग आहे. 'फेरोमोन ट्रेल' (Pheromone Trail)। हा एक प्रकारचा रासायनिक सिग्नल आहे, जो मुंग्या या एकमेकांना मार्ग दाखवण्यासाठी सोडतात. चला तर जाणून घेऊया की मुंग्या या ट्रिकचा वापर कसा करतात आणि त्यांच्या असं करण्या मागचं खरं कारण काय आहे.
1. फेरोमोन ट्रेल: मुंग्याची भाषा
जेव्हा कोणती मुंगी ही जेवण कुठे आहे हे शोधण्यासाठी निघतात आणि ज्या मुंगीला जेवण मिळतं. ती मुंगी तिच्या घरी जात असताना जमिनीवर फेरोमोन सोडत जाते. हे फेरोमोन दुसऱ्या मुंग्यांसाठी असलेला एक संकेत असतो. ज्यामुळे त्या त्याच रस्त्यावर चालतात आणि जेवण जिथे आहे तिथे पुन्हा जाऊ शकतात आणि त्याशिवाय इतर मुंग्याही तिथे जाऊन जेवण घेऊन येतात. महत्त्वाचं म्हणजे फक्त जेवणासाठीच नाही तर कोणतं संकट असेल किंवा कोणत्या शत्रूविषयी सांगायचं असेल तर त्या फेरोमोनच्या मदतीनं एकमेकांना याविषयी सतर्क करतात.
2. सरळ रेषेत का चालतात?
मुंग्या एका रेषेत चालण्याचं कारण म्हणजे त्या त्यांच्या पुढे असलेल्या मुंगीनं सोडलेल्या फेरोमोनच्या रस्त्यावर चालत राहतात. हा जो ट्रेल आहे, तो जितका मजबूत असतो तितकीच जास्त मुंग्या त्या रस्त्यावरून जातात.
3. एका रेषेत चालण्याचे फायदे
ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचणं सोपं होतं.
मिळून काम करण्यास मदत होते.
4. मुंग्या मार्ग बदलतात का?
जर काही कारणांमुळे रस्त्यात अडथळा आला किंवा दुसरा सोपा रस्ता मिळाला तर मुंग्या त्यांचा रस्ता बदलू शकतात. नवीन मुंग्या त्यांच्या रस्त्यावर फेरोमोन सोडतात आणि इतर मुंग्या त्यांना फॉलो करतात.
5. फेरोमोन ट्रेल गायब झाला तर?
जर काही कारणांमुळे फेरोमोन ट्रेल गायब झाला तर मुंग्यांना त्यांचा रस्ता शोधण्यास कठीण होतं. ते कधी कधी इथे-तिथे भटकू लागतात. ते तो पर्यंत सुरु राहतं जो पर्यंत फेरोमोन ट्रेल बनवत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)