राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश

नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला बाबा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. रोहतक जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे पंचकूलाच्या सीबीआई कोर्टात हजर केलं जाणार आहे. रोहतक जेलच्या परिसरात कोणताही अपरिचित व्यक्ती दिसताच गोळ्या गालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये भारतीय जवानांच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पंजाबच्या मुक्तसर, मनसा जिल्हा आणि हरियाणाच्या सिरसा आणि पंचकूलामध्ये जवानांना तैनात करण्यात आलं आहे. सेनेच्या एका तुकडीत जवळपास १०० ते १२० जवान आहेत. हरियाणाचे एडीजीपींनी सांगितलं की,  रोहतकमध्ये अर्धसैनिक दलाच्या २३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रोहतक, सिरसा, अंबाला, पंचकूलासह अनेक जिल्ह्यांमध्ये धारा १४४ लागू करण्यात आली आहे. हिंसा करणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
order to shoot devotees of Ram Rahim in jail area
News Source: 
Home Title: 

राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश

राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
No