RINL PSU Sale : केंद्र सरकारनं (Central Government) आणखी एक कंपनी विकण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते आहे. सरकारला राष्ट्रीय इस्पात निगम लिमिडेट (RINL) मधील आपला संपुर्ण हिस्सा विकायचा असल्याची माहिती कळते आहे. यासाठी कंपन्यांकडून पुढच्या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत प्रस्ताव (EOI) मागवता येतील. त्यामुळे या कंपनीचा हिस्सा विकत घेण्यासाठी मोठ मोठ्या कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्यात सध्या दोन मोठी नावं पुढे येत आहेत आणि त्यातील दोन मोठी नावं म्हणजे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) आणि जगातले सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांनी देखील या कंपनीचा हिस्सा घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. (Govt Plans To Sell a Profitable Company Disinvestment Of RINL Tata And Adani Shown Interest)
2021-22 या आर्थिक वर्षात (financial year) कंपनीला 913 कोटी रुपयांचा नफा झाला होता तर या कंपनीची उलाढाल 28,215 कोटी रुपये होती. त्यासाठी डिसेंबरच्या सुरुवातीला निविदापूर्व सल्लामसलत बैठक पार पडल्याचे सूत्रांचे म्हणणे असून समोर आलेल्या माहितीनुसार टाटा स्टील, अदानी ग्रुप आणि जेएसडब्ल्यू सारख्या कंपन्यांनी हा हिस्सा विकत घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.
RINL चा प्लांट गंगावरम बंदराजवळ आहे आणि मुख्य म्हणजे अदानी समूहाच्या (adani group) मालकीचा हा बंदर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरआयएनएलकडे 22 हजार एकर जमीन आहे आणि अनेक नामवंत कंपन्या ती खरेदी करण्यासाठी आपली उत्सुकता दर्शवत आहेत. त्यात अडानी हे एक आहेत. टाटा स्टील, अदानी समूह आणि जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) या कंपन्यांसह सात कंपन्यांनी या कंपनीचा हिस्सा विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. या कंपनीच्या स्ट्रॅटेजिक सेलसाठी सरकारने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रोडशोचे आयोजन केले होते ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यातून स्टील कंपन्यांसाठी एक चांगला उपक्रमही राबवला होता.
यापूर्वी टाटा स्टीलचे सीईओ टीव्ही नरेंद्रन यांनी सांगितले होते की त्यांची कंपनी आरआयएनएलचा प्लांट खरेदी करण्यास इच्छुक आहे. हा प्लांट किनारी भागात असून तो खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले होते. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या केंद्र सरकारला या कंपनीतील आपले संपूर्ण 100 टक्के स्टेक (company stake) एका झटक्यात विकायचे आहेत परंतु ते मूल्यांकनावर अवलंबून आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की कंपनीच्या व्यवहाराची रचना तयार केली जात आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
या विक्रीला आरआयएनएलचे कर्मचारी विरोध करत आहेत. केंद्र सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे की धोरणात्मक विक्रीच्या अटींमध्ये त्यांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल. CCEA ने जानेवारी 2021 मध्येच RINL मधील सरकारचा संपूर्ण हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. RINL देशातील पहिल्या सहा कंपन्यांमध्ये आहे. त्याची वार्षिक क्षमता 75 लाख टन आहे. हे अनेक कंपन्यांना स्ट्रक्चरल स्टीलचा पुरवठा करते. यामध्ये आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टीलचा समावेश आहे. 2021-22 मध्ये कंपनीला 913 कोटी रुपयांचा नफा (company profit) झाला होता तर कंपनीची उलाढाल 28,215 कोटी रुपये होती.