IDBI Job: तुम्ही पदवीधर आहात आणि बॅंक भरतीची तयारी करताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. आयडीबीआय बँकत नोकरीची संधी चालून आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आयडीबीआय बॅंकमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (जेएएम) च्या 650 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी प्रवर्गानुसार 260 पदे अराखीव प्रवर्गासाठी आहेत. 100 पदे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, 54 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, 65 पदे ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी आणि 171 पदे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयात सवलत देण्यात येईल, याची नोंद घ्या. उमेदवारांच्या वयाची गणना 1 मार्च 2025 लक्षात घेऊन केली जाईल, याची नोंद घ्या.
आयडीबीआय बॅंक ज्युनियर असिस्टंट मॅनेजर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग वर्गातील उमेदवारांकडून 250 रुपये शुल्क घेतले जाईल, याची नोंद घ्या.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन चाचणीला उपस्थित राहावे लागेल. ऑनलाइन परीक्षेत निर्धारित कटऑफ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आणि त्यांना नियुक्ती दिली जाईल.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू होणार आहे. 12 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदवीधर असलेले सर्व उमेदवार आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.idbibank.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.