लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांना दिलासा; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today In Mumbai: आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे भाव

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 27, 2025, 11:09 AM IST
लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांना दिलासा; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर
27 feb Gold Rate drop Today in the market silver price today in mcx check rates

Gold Rate Today In Mumbai: उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. वायदे बाजारात सोन्याच्या दरात जवळपास 120 रुपयांची घसरण झाली आहे. MCX वर आज सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याच्या दरात 0.5 टक्क्यांची घट झाली असून कॉमेक्सवर भाव $2,910 रुपयांवर आहे. 2024मध्ये सोनं 11वेळा उच्चांकीवर पोहोचले होते. मात्र US मध्ये महागाई वाढण्याची शक्यता असून पुढील फेडरेलच्या निर्णयावर गुंतवणुकदारांचे लक्ष असणार आहे. 

जानेवारीपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांतच सोनं महाग झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र कालपासून सोन्याचे दर किंचितसे घसरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर चांदीदेखील 500 रुपयांच्या घसरणीनंतर एक लाख रुपयांवर पोहोचली आहे. 99,500 रुपये प्रती किलोग्रॅमवर चांदी पोहोचली आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घट झाली असून 66,540 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,380 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,540 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,010 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,738 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,554 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   69,904 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,432 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,100 रुपये
24 कॅरेट- 87,380 रुपये
18 कॅरेट-  65,540 रुपये