उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर आज कोसळले; वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 26, 2025, 12:58 PM IST
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर आज कोसळले; वाचा 24 कॅरेटचे दर
26 feb Gold Rate Today in the market silver price today in mcx

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने विक्रमी दर गाठला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोनं 90 हजारांवर पोहोचू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 80,500 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उलाढाली आणि घटनांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मार्चपासून लग्नसराईंना मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. त्यामुळं सोनं खरेदीसाठी झुंबड उडते. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 87,820 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोनं 200 रुपयांनी स्वस्त झाले असून प्रतितोळा 65,870 रुपयांवर पोहोचले आहे. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,820 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,870 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,050 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,782 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,587 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,400 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,256 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    65,870 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-80,500 रुपये
24 कॅरेट- 87,820 रुपये
18 कॅरेट- 65,870 रुपये