बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून तृप्ती डिमरीने घेतले अभिनयाचे धडे! खुलासा करत म्हणाला, 'ती आली तेव्हा...'

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून घेतले अभिनयाचे धडे...

दिक्षा पाटील | Updated: Feb 26, 2025, 03:48 PM IST
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून तृप्ती डिमरीने घेतले अभिनयाचे धडे! खुलासा करत म्हणाला, 'ती आली तेव्हा...'
(Photo Credit : Social Media)

Saurabh Sachdeva-Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेता सौरभ सचदेव हा फक्त अभिनय करत नाही तर त्यासोबत अभिनयाटे धडे देखील देतो. तो एक अभिनय कोच म्हणून ओळखला जातो. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात तो त्याच्या एका विद्यार्थीनिसोबत दिसला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सौरभ सचदेवची विद्यार्थीनी आहे तरी कोण? तर सौरभ सचदेव हा बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचा अ‍ॅक्टिंग कोच आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सौरभ सचदेवनं तृप्ती डिमरी आली तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे याविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

सौरभ सचदेवनं ही मुलाखत जागरण फिल्म फेस्टिव्हलला दिली होती. सौरभ सचदेव यावेळी या मुलाखतीत म्हणाला की 'तृप्ती जेव्हा नवीन नवीन इथे आली होती तेव्हा तिनं त्याच्याकडून ट्रेनिंग घेतली होती. तेव्हा ती लैला मजनू या चित्रपटात काम करत होती. ती खूप Introvert होती. असं असलं तरी तिला ज्या काही गोष्टी आहेत ज्या सगळ्या समजून आणि शिकून घ्यायच्या असतात. मागे थांबून काम करायची तेव्हा मी बोलायचो की जे भितींजवळ काम करत आहेत त्यांनी पुढे या. त्यानंतर ती हळू-हळू करून पुढे येऊ लागली आणि नंतर ती पुढेच येऊन बसू लागली. ज्या प्रकारे ती माझं ऐकायची. ज्या पद्धतीनं एक्सरसाईजेस करायची, ते कमाल होतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Actor's Truth (@theactorstruth)

सौरभ सचदेवनं फक्त तृप्ती डिमरी नाही तर तिच्यासोबत वरुण धवन, अर्जुन कपूर, ऋचा चड्ढा, राघव जुयाल, कुब्रा सैत, दुलकर सलमान, अविनाश तिवारी, जॅकलिन फर्नांडीज, वाणी कपूर, आशा नेगी, शक्ति मोहन, ऋत्विक धनजानी आणि मंदाना करीमी सारख्या कलाकारांची नावं आहेत. 

हेही वाचा : प्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! VIDEO शेअर करत म्हणाली 'उगाच...'

'अ‍ॅनिमल' आधी सौरभ सचदेवनं इतर चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अभिनयाची जादू दाखवली आहे. या आधी सौरभ सचदेवनं अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीची वेब सीरिज सेक्रेड गेम्समध्ये काम केलं आहे. सीरिजमध्ये त्यानं सुलेमान ईसाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्यानं बम्बई मेरी जान आणि कला या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सौरभ सचदेव आता 'मनमर्जिया', 'लाल कप्तान', 'हाउसफूल 4', 'वध' सोबत इतर चित्रपटांमध्ये दिसला आहे.