बुरखा परिधान करुन सेटवर पोहचली अभिनेत्री; कॅमेरा बघून उतरु लागली कपडे; सगळ्यांनाच बसला धक्का

मुंबई : 45 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीला ड्रामा क्विनम्हणून देखील ओळखलं जातं. राखीने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय नेहमी चर्चेत राहण्यासाठी राखी पापारांझीसमोर अतरंगी अवतारात दिसते. तर अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. 

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी राखीबद्दल तुम्हाला हे माहितीये का? ऐकेकाळी राखीचं बॉलिवूडमधील आयटम गर्ल म्हणून करिअर शिखरावर होतं तेव्हाच अभिनेत्रीने शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांच्या 'मैं हूं ना' या प्रसिद्ध चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. हा सिनेमा फराह खानने दिग्दर्शित केला होता. मुख्य म्हणजे फराहचा दिग्दर्शन म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. 2004 साली रिलीज झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमात शाहरुख आणि सुष्मिता व्यतिरिक्त सुनील शेट्टी, अमृता राव आणि झायेद खान या कलाकारांच्याही मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात राखीनेही महत्वपुर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात राखी मिनी या भूमिकेत दिसली होती. 

आता हा सिनेमा रिलीज होवून २० वर्ष झाली आहेत. २० वर्ष झाल्याच्या निमीत्ताने फराह खानने राखी सावंतच्या ऑडिशनला घेवून एक खुलासा केला आहे. तिने तिच्या खुलासामध्ये सांगितलं आहे की,  राखी सावंत 'मै हू ना'च्या ऑडिशनसाठी बुरखा परिधान करुन सेटवर पोहचली होती ज्याच्या आतमध्ये तिने बिकीनी घातली होती. तिने तिच्या पहिल्या ऑडिशनने कॅमेरासमोर धुमाकूळ घातला होता.  हा राखीचा पहिला चित्रपट होता.

फराह खानेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयी मोठा खुलासा केला आहे. याविषयी बोलताना राखी म्हणाली की, दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत मैं हूं ना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी झाली. चित्रपटात मिनीच्या भूमिकेसाठी तिने आणखी एका अभिनेत्रीला कास्ट केलं होतं, मात्र त्या अभिनेत्रीच्या आईने तिच्या मुलीला एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली होती, ज्या हॉटेलमध्ये शाहरुख राहत होता. शूटिंग सुरू होण्यापूर्वीच त्या अभिनेत्रीने माझ्याकडे अनेक मागण्या केल्या होत्या. याचा मला खूप राग आला होता. त्यामुळे मी ठरवलं की, तिची जागा दुसऱ्या कोणाला द्यायचा. 

 मी लगेच माझ्या असिस्टंटला फोन करून विचारलं की, या भूमिकेसाठी आणखी कोणत्या अभिनेत्रीचं ऑडिशन दिलं होतं? फराह पुढे म्हणाली,  ज्यात मला समजलं की, राखीची ऑडिशन टेस्ट झाली जिथे ती बुरखा घालून आली होती. ऑडिशनची आठवण सांगताना फराह म्हणाली, 'राखी बुरखा घालून ऑडिशनसाठी आली होती. 'हॉट गर्ल रोल' असल्याने असिस्टंट सावध होता. मात्र, राखीने तिच्या खास शैलीत कॅमेरा फिरवण्यास सांगितला. मग तिने बुरखा काढला आणि कॅमेरा समोर धुमाकूळ घातला. मग काय राखीने आतमध्ये बिकीनी घातली होती.   

फराह असंही म्हणाली की, तिने राखीला लगेच कास्ट केलं नाही. कारण त्यावेळी तिचे केस भगव्या रंगाचे होते. मात्र काही दिवसांनी तिने राखीला मिनी या भूमिकेसाठी कास्ट केलं. मात्र एकवेळ जेव्हा ती दार्जिंलिंगला आली तेव्हा तिचा चिंता ही देखील होती की, तिचे केस कसे लपवायचे. यासाठी तिने तिचा स्वेटर आणि मफलर दिला पण तिला एक्सपोज करायचं होतं. नंतर फराहला राखीला सांगावे लागले की तीही अशीच क्यूट दिसते. राखीसोबत काम करणं खूप आनंददायी असल्याचं फराहने सांगितलं. तिच्यासोबत काम करणं खूप छान होतं. तिची एकच विनंती होती की, तिला गाण्यात शाहरुखच्या शेजारी किंवा त्याच्या मागे उभे केलं जावं. त्यात ती खूश होती.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
The actress rakhi sawant reached the set wearing a burqa started taking off her clothes after seeing the camera the director held her forehead the staff became alert
News Source: 
Home Title: 

बुरखा परिधान करुन सेटवर पोहचली अभिनेत्री; कॅमेरा बघून उतरु लागली कपडे

बुरखा परिधान करुन सेटवर पोहचली अभिनेत्री; कॅमेरा बघून उतरु लागली कपडे; सगळ्यांनाच बसला धक्का
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
बुरखा परिधान करुन सेटवर पोहचली अभिनेत्री; कॅमेरा बघून उतरु लागली कपडे
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, March 11, 2024 - 15:12
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
459