सोनू निगमचा मुलगा निवान आणि त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने वडिलांसोबत 'अभी मुझमें कही...' हे गाणं गायलं होतं. या व्हिडीओत निवान अतिशय गोड दिसत होता. आपल्या प्रत्येकाला निवानचा हाच क्युटनेस लक्षात आहे. पण आजा निवानचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे.
निवानने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत डेब्यू केला आहे. यामध्ये त्याचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. यामध्ये त्याने 5 फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना निवानने लिहिलं आहे की, 2 वर्षात माझ्या आयुष्यात झालेला बदल. ही कॅप्शन देऊन त्याने इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.
सोनू निगमने देखील सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सोनूने देखील म्हटलं आहे की, परमेश्वराची कायम तुझ्यावर कृपादृष्टी राहू दे. मिळालेल्या माहितीनुसार, निहान निगम 17 वर्षांचा आहे. त्यांचा जन्म 25 जुलै 2007 रोजी झाला. त्याच्या आईचे आणि सोनूच्या पत्नीचे नाव मधुरिमा निगम आहे. निवान दुबईमध्ये राहतो. त्याच्या वडिलांप्रमाणेच तो गायनात कुशल आहे आणि तो एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहे. सोनू निगम एकदा म्हणाला होता की त्याला त्याचा मुलगा गायक बनू इच्छित नाही. त्यांना तो भारतात राहू द्यायचाही नाही.
निवान निगमने त्याच्या पहिल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, या शारीरिक परिवर्तनासाठी 2 वर्षांची कठोर मेहनत लागली. टायगर श्रॉफ देखील त्याचा चाहता झाला आहे. मधुरिमा निगमने तिच्या मुलाच्या पोस्टवर कमेंट केली, 'माझ्या राजा, तू खूप मेहनत केली आहेस आणि तू सर्व कौतुकास पात्र आहेस... त्यासाठी दृढनिश्चय आणि समर्पण लागते... मला तुझा अभिमान आहे माझ्या मुला.'