सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर धर्म बदलला? म्हणाली - 'मी त्याच्या नियाजला बसले आणि...'

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बालचं लग्न झाल्यानंतर अभिनेत्री बदलला का? त्यावर उत्तर देत सोनाक्षी म्हणाली...

दिक्षा पाटील | Updated: Feb 27, 2025, 01:55 PM IST
सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर धर्म बदलला? म्हणाली -  'मी त्याच्या नियाजला बसले आणि...'
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं आंतरधर्मिय लग्नावर मोकळेपणानं बोलली आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धर्म परिवर्तन करण्याच्या प्रश्नावर वक्तव्य केलं आहे. सोनाक्षीनं सांगितलं की 'आम्ही कधीच धर्माविषयी विचार केला नाही. इथे दोन लोकं आहेत जे एकमेकांवर खूप प्रेम करतात. ज्यांना लग्न करायचं आहे आणि लग्न करणार आहेत. तो माझ्यावर त्याचा धर्म थोपवत नाही आणि नाही मी त्याच्यावर माझा धर्म थोपवते.'

सोनाक्षीनं 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'आम्ही धर्माविषयी कधी चर्चा केली नाही. आम्ही एकमेकांच्या संस्कृतींचा आदर करतो आणि एकमेकांना समजून घेतात. झहीर त्याच्या परंपरांचे पालन करत आहे आणि मी माझ्या घराच्या परंपरांचं पालक करत आहे. ते येऊन दिवाळी पूजेत बसतो आणि मी त्याच्या नियाजमध्ये बसते. फक्त हेच महत्त्वाचं आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

पुढे सोनाक्षी म्हणाली, 'लग्न करण्याची सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट. या अ‍ॅक्टच्या अंतर्गत मला एका हिंदू महिलेला माझा धर्म बदलण्याची गरज पडली नाही आणि एका मुस्लिम पुरुषाला मुस्लिम राहण्याचा हक्क मिळतो. या पद्धतीनं दोन प्रेम करणारे लोकं लग्नाच्या या सुंदर अशा बंधनात राहू शकतात. मला कधी कोणताही प्रश्न विचारण्यात आला नाही... तुम्ही धर्म परिवर्तन करणार आहात? आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही लग्न करतोय. बस इतकंच होतं. यावरून कोणताही प्रश्न नव्हचा. कारण तुम्ही धर्म बदलणार आहात? आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि ते पुरेसं आहे.'

हेही वाचा : महेश मांजरेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट? आगामी चित्रपटात शाहरुख खान? म्हणाले, 'त्याला माहितीये की तो...'

सोनाक्षीनं हे स्पष्ट केलं की झहीर किंवा त्याच्या कुटुंबानं कधी तिच्यावर धर्म बदलण्यावरून कोणतीही जबरदस्ती केली नाही. ते तिच्या धर्माचा आणि ती त्यांच्या धर्माचा आदर करते. गेल्या वर्षी अर्थात 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीरनं लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत संपूर्ण बॉलिवूड उपस्थित झालं होतं. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.