Sonakshi Sinha Scared Of Swimming In Mumbai Or in India : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधीच तिचं खासगी आयुष्य तर कधी तिचे आगामी प्रोजेक्ट्स. पण सध्या सोनाक्षी चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे. अनेकांना माहित नसेल पण सोनाक्षी सिन्हा ही एक सर्टिफाइड स्विमर आहे. ती नेहमीच समुद्रात आणि महासागरात पोहताना दिसते. आता तिनं खुलासा केला की ती मुंबई किंवा भारताच्या कोणत्याही समुद्रात पोहत नाही कारण तिला भीती वाटते की कोणी तिचा गुपचूप लपून फोटो काढायला नको.
सोनाक्षी सिन्हानं 'हॉटरफ्लाई' ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. तिनं सांगितलं की 'जेव्हा स्विमवियर परिधान करण्याची वेळ येते तेव्हा ती काळजी घेते. तिनं हे देखील सांगितलं की ती रिलॅक्स आणि मनोरंजनासाठी स्विमिंग करते. पण असं असलं तरी सुद्धा तिचे फोटो हे सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर व्हायरल व्हावे अशी तिच्छा इच्छा नाही.'
सोनाक्षीनं पुढे सांगितलं की, 'मी कायम स्विमवियर परिधान करताना थोडी काळजी घेते आणि त्यातही मोठं झाल्यापासून जास्तच. मी मुंबई किंवा या देशात पोहत नाही. कारण कधी कोणी गुपचूप माझे फोटो काढेल आणि एकमेकांना शेअर करेल हे माहित नाही. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी फिरायला जाताना पोहते. डुबकी घेते.'
सोनाक्षीला तिच्या वजनामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. तिनं सांगितलं की 'एकदा तर मला खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण माझं वजन जास्त आहे या एका कारणामुळे मला काम मिळालं नाही. त्यांनी सांगितलं की त्या भूमिकेत मी चांगली दिसणार नाही.'
हेही वाचा : ऑस्कर विजेता अभिनेता पत्नीसोबत राहत्या घरात मृतावस्थेत सापडला; श्वानाच्या मृतदेहानं गूढं वाढले
कामाविषयी बोलायचं झालं तर सोनाक्षीनं 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटात ती दिसली होती. तर सगळ्यात शेवटी सोनाक्षी ही 'बडे मिया छोटे मिया' आणि 'ककुडा' मध्ये दिसली. या वर्षी संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मध्ये ती दिसली होती. तिच्या अभिनय कौशल्यानं सगळ्यांची मने जिंकली. आता सोनाक्षी 'निकिता रॉय और द बुक ऑफ डार्कनेस' मध्ये दिसणार आहे आणि त्याच्या प्रदर्शनाची तारिख अजून निश्चित झालेली नाही.